महाभारत युद्ध सत्तास्पर्धंमुळे घडले नाही पांचालीमुळे तर नाहीच नाही ते घडले द्रोणामुळे... द्रुपदाने केलेल्या त्याच्या अपमानामुळे सुडसंतप्त द्रोण कौरव - पांडवांचा गुरु बनत त्यांचे सहाय्य घेत जर द्रुपदावर घाला घातला नसता तर द्रुपदाने यज्ञातून धुष्टद्युम्न आणि द्रौपदीची निर्मिती केली नसती... पुढचे सूडनाट्य सुरूच झाले नसते आणि त्या सूडनाट्याचा शेवट न्याय्य बाजूलाच बदनाम करण्यात झाला नसता... अशवत्थाम्याला चिरकाळ ती भळभळती जखम भाळावर वागवावी लागली नसती !