जीवनातील सत्-असत् वृत्तीचा संघर्ष हा पुराणकाळापासून साहित्याचा विषय झाला आहे. आजच्या समाजव्यवस्थेत वाममार्गाने अफाट द्रव्यप्राप्ती करणारा वर्ग, या द्रव्यप्राप्तीच्या अनुषंगाने येणारी धुंदी आणि सामर्थ्य व त्यामुळे होणारा मानवी मूल्यांचा चुराडा, बुद्धिजीवी वर्गाची ससेहोलपट, त्यांच्या व्यथा हा सारा भाग हा याच संघर्षाचे नवे स्वरूप होय. पैशांबरोबरच भ्रष्टाचारही या धनिक लोकांनी शिक्षणक्षेत्रांत आणला. आणि या भ्रष्टाचारात सामील न होणाऱ्या विद्यानंदसारख्या प्राध्यपकाची मुळे जमिनीतून उखडून टाकण्याच्या प्रयत्नात ही माणसे गुंतली. हा सर्वच संघर्ष मांडताना वसन्त कानेटकर ढोबळ कृत्रिमतेबरोबर एक सूक्ष्म सत्य सूचित करून जातात.
‘नाट्यसंपदा’ ह्या संस्थेने ह्या नाटकाचे शेकडो प्रयोग केले. मराठी प्रेक्षकांच्या मनात काशीनाथ घाणेकर (लाल्या) आणि प्रभाकर पणशीकर (विद्यानंद) ही कायमची घर करून बसली आहेत.
Thanks for subscribing!
This email has been registered!