पुस्तकाबद्दलची माहिती
दैनिक सकाळच्या 'सप्तरंग' पुरवणीतील 'भ्रमंती लाईव्ह' या वाचकप्रिय सदरातील निवडक लेखांचे संकलन. या भ्रमंतीदरम्यान समाजातील विविध स्तरांवरील लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर समाजमनाला जागृत करण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. एकमेका साह्य करू.. असे म्हणत सहकार्याने अश्रूंचेही फुलात रूपांतर करता येते असा आशावाद जागवणारे पुस्तक.
लेखक संदीप काळे यांच्याबद्दल
सकाळ युथ यिनबझचे संपादक म्हणून मुंबई येथे कार्यरत. पत्रकारितेतील दीर्घानुभव. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य. महाराष्ट्र भूषण, महाराष्ट्र गौरव इत्यादी अनेक पुरस्कारांचे मानकरी. आजवर २१ पुस्तके प्रकाशित. भ्रमंती लाईव्ह सदरामुळे विशेष ओळख.
Thanks for subscribing!
This email has been registered!