हे पुस्तक मातृत्वाविषयी सांगत असतानाच त्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या, समस्या यांचाही परामर्श घेते. आई म्हणून तुम्हाला मूल्यांचे महत्त्व निश्चितपणे अधिकच वाटते. मातृत्वासाठी आवश्यक असणारा विश्वास तुम्ही कसा मिळवाल, त्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न करावेत, मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तुम्ही काय कराल इत्यादींबरोबरच प्रामाणिकपणा, सहनशीलता, नम्रता, औदार्य, सत्यता, शिस्त, क्षमाशीलता ही आणि अशी इतर मूल्ये आपल्या मुलांमध्ये रुजावीत असे सर्वच मातांना वाटते. त्यासाठीचे योग्य मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे. त्याचबरोबर लहान-मोठ्या प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात दिली आहेत. आई म्हणून तुमच्याकडे आवश्यक असणारा दृष्टिकोन, तुमची शैली याविषयीही हे पुस्तक सविस्तर चर्चा करते.