आशिया खंडातील वैदिक संस्कृतीच्या विस्ताराचा इतिहास... कंबोडियापासून श्रीलंकेपर्यंत आणि सिंगापूरपासून फिलिपाइन्सपर्यंतच्या प्रदेशात किमान दोन हजार वर्षं वैदिक हिंदू राजांच्या राजवटी होत्या. उझबेकस्तानापासून चीनपर्यंत आणि इंडोनेशियापासून कोरिया-जपानपर्यंत भारतीय संस्कृतीचा आणि संस्कृत भाषेचा प्रभाव सर्वत्र पसरला होता, हे आपल्या पाठ्य-पुस्तकांमधून फारसं सांगितलं जात नाही. इंग्रजांच्या आणि कम्युनिस्टांच्या प्रभावाखालील भारतीय राज्यकर्त्यांनी दीर्घकाळ दडवलेला हा गौरवशाली इतिहास या पुस्तकामधून साधार मांडायचा प्रयत्न केला आहे.