'अर्वाचीन मराठी वाङ्मय : स्वरूप, 'आकलन व वाटचाल'
हा प्रा. डॉ. संदीप सांगळे संपादीत ग्रंथ मराठी समीक्षेच्या प्रांतातील मैलाचा दगड ठरावा. अशी आशा वाटते. मराठी विषयाच्या राज्यस्तरीय चर्चासत्राच्या निमित्ताने डॉ. सांगळे यांनी विविध अभ्यासकांच्या चिंतनातून साकार केलेला प्रस्तुत ग्रंथ मराठी विषयाचे अध्ययन, अध्यापन व संशोधन करणाऱ्या सर्वांसाठीच मौलिक ठरेल असे वाटते.
प्रस्तुत ग्रंथातील विविध अभ्यासकांनी आपल्या चिंतनशिलतेतून साकारलेले लेखन सर्वच अर्थाने दिशादर्शक ठरणारे आहे. साहित्याच्या विविध प्रकारांना अभ्यासकांनी प्रस्तुत ग्रंथात न्याय देण्याचा केलेला प्रयत्न स्त्युत वाटतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यासमंडळाचे सदस्य व माझे सहकारी मित्र प्रा. डॉ. संदीप सांगळे यांनी प्रस्तुत ग्रंथ साकार करून अध्ययन, अध्यापन व संशोधन करणाऱ्या सर्वांसाठीच उपलब्ध केलेली सुवर्णसंधी पर्वणी ठरावी ही अपेक्षा !
- प्रा. डॉ. शिरीष लांडगे-पाटील
अध्यक्ष, मराठी अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.
Thanks for subscribing!
This email has been registered!