मराठी वाङ्मयाच्या आरंभबिंदूपासून आजतागायत समृद्ध, संपन्न आणि अविच्छिन्न परंपरा लाभलेल्या अर्वाचीन काळातील काव्यनिर्मितीची विविधलक्ष्यी मीमांसा प्रस्तुत बृहद्ग्रंथात प्रथमच एकत्रितपणे संगृहीत करण्यात आली आहे.
कवितेच्या विचारभावनाव्यूहाची आणि आकृतिबंधाची स्वरूपमीमांसा, प्रमुख काव्यप्रकारांचे व्यापक विश्लेषण, अर्वाचीन काळात उदयास आलेल्या विविध विचारधारांचा कवितेशी असणारा अनुबंध व त्यातून फुललेल्या विविध काव्यरूपांचा घेतलेला शोध, स्वातंत्र्योत्तर काळात उदयास आलेल्या नव्या आशयानुगामी काव्यप्रवाहांचे केलेले विश्लेषण, मानसशास्त्र, शैलीशास्त्र, छंद:शास्त्र, आदिबंध इत्यादी शास्त्रे आणि संकल्पना यांच्या आधारावर आकारास आलेल्या काही लक्षणीय समीक्षापद्धतींचा तात्त्विक परिचय आणि उपयोजन, लय, पोत, मानुषता आदी आधुनिक सिद्धांतांचे पुनर्विलोकन व त्या आधारे अर्वाचीन काव्याची होऊ शकणारी संभाव्य समीक्षा इत्यादींच्या मौलिक आकलन-मांडणीने एकूणच काव्यमीमांसेला अन्वर्थकता आणि नवी परिमाणे प्राप्त करून देणारा हा व्यापक काव्यशोध काव्याभ्यासकांच्या नव्या वाटा उजळणारा आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!