सर्वसामान्यपणे आढळणा़ऱ्या अनेक आजारांविषयी तसेच काही अपरिचित आजारांविषयी, त्यांच्या लक्षणांविषयी, त्यावरील उपचार पद्धतींविषयी सोप्या भाषेत माहिती. विविध तपासण्या, चाचण्या, शस्त्रक्रिया का केल्या जातात याविषयी पडणारे प्रश्न आपल्या डॉक्टरांना विचारण्याचे धैर्य रुग्णाकडे असतेच असे नाही किंवा रुग्णाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याइतकी फुरसत डॉक्टरांना असतेच असेही नाही. अशा अनेक
शंकांचे निरसन करणारे पुस्तक.
शास्त्रीय माहिती असूनही अनावश्यक पारिभाषिक शब्दांना फाटा देऊन सर्वसामान्यांनाही कळेल अशा सोप्या शब्दांत केलेले लेखन.