पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्राविषयी आता बरीच माहिती उपलब्ध आहे. पण एक काळ असा होता की चंद्राविषयीचे कुतूहल शमविण्यासाठी माणूस अहोरात्र धडपडत होता. चंद्रावर माणसाला उतरता येईल का, या ध्यासाने पछाडलेल्या खगोल शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमांना आलेले यश म्हणजे अपोलो ११. खरेतर रशिया आणि अमेरिका हे दोन्ही देश चंद्रावर माणूस उतरवण्यासाठी प्रयत्नशील होते. पण अपोलो ११ यानामधून नील आर्मस्ट्रॉंगने चांद्रद्रभूमीवर पाऊल ठेवले आणि या स्पर्धेत अमेरिकेने बाजी मारली.
शतकातील सर्वात मोठी घटना म्हणून जिचे वर्णन करता येईल, अशा अपोलो ११ मोहिमेला येत्या २० जुलै २०१९ मध्ये ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने अपोलो ११ मोहिमेचा संपूर्ण इतिहास रंजक शैलीत व सचित्र पद्धतीने या पुस्तकात दिला आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!