अपार
हातांत फिरावयला जाण्याची
काठी,
धोतर,
अंगांत सदरा.
हडकुळें शरीर.
रस्त्याच्या कडेने
चाललों असेन.
बाजूला तूं असशील.
मी बोलत असेन,
आयुष्याविषयीं कांही.
तुझ्या मनांत
आठवणींची
ऊठबस असेल.
क्षितिज आलेलें असेल,
जवळ.
अंधार असेल,
उजाडण्यापूर्वी होता तो.
दिसत असेल,
नसेल.
पार करतांना हें जग,
अपार वाटत असेल.
Thanks for subscribing!
This email has been registered!