डॉ. पंडितराव पवार यांना कवी अनिलांची कविता आवडते. साध्यासरळ भावनेनेच त्यांनी
अनिलांच्या एकवीस कवितांचा आस्वादनिष्ठ परिचय येथे घडविला आहे. अनिलांच्या इतक्या कविता इतक्या प्रसिद्ध आहेत की कोणत्या कविता निवडू आणि कोणत्या नाही, असा संभ्रम
कोणालाही पडावा! डॉ. पवारांनी आपल्या अभिरुचीशी इमान राखून एकवीस मोदकांची निवड केली आहे; मात्र त्यात मिठाचा मोदक एकही नाही!
या संग्रहाचे प्रास्ताविक आणि अखेरची चार परिशिष्टे काव्य आणि भाष्य या विभागाइतकीच
महत्त्वपूर्ण आहेत.
अनिलांच्या समग्र प्रतिभेकडे अंगुलिनिर्देश करणारे हे पुस्तक आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!