राजा विक्रमादित्य आणि वेताळ यांच्या गोष्टी अगदी लहानपणापासून आपल्याला सोबत करत आल्या आहेत. प्रश्न विचारणारा वेताळ आणि उत्तर देणारा विक्रमादित्य. आजही प्रश्न आहेत, काळानुसार प्रश्नांचं स्वरूपही बदललेलं आहे आणि त्यानुसार उत्तरंही. परंतु ही उत्तरं म्हणजे प्रश्नांची समाप्ती नव्हे — वेताळ आजही भेडसावणारे प्रश्न विचारत आहे. विक्रमादित्य आजही उत्तरं देतो आहे. पण उत्तरं देता देता विक्रमादित्य खचत जातो आहे. आणि शेवटी हरतो आहे... प्रश्न — आता प्रत्येकाच्या मानगुटीवर आरूढ होऊन नंगानाच करत आहेत....