ही सुष्टशक्ती आणि दुष्टशक्ती यांच्या मधल्या वर्षानुवर्षे चाललेल्या लढाईची रहस्यमय कथा आहे. दुष्टशक्तीला भूतलावरचं आपलं वर्चस्व वाढवायचं असल्याने ते एक अघोरी योजना आखतात. निशा आणि तिचे आई-वडील या अघोरी योजनेचाच एक भाग बनतात. दुष्टशक्तींच्या जास्त प्रभावाखाली असल्याने निशा यात सक्रिय असते आणि मुख्य म्हणजे दुष्टशक्तीला हरवू पाहणार्या महान साधक महंतांसाठी सापळाही ठरते. 400 वर्षांपूर्वी या दुष्टशक्तीशी लढताना महंतांचा वध झाला ते ठिकाण म्हणजे निशाचे घर आहे. ज्यावर आता संपूर्णपणे दुष्टशक्तीचा प्रभाव असतो. निशा व तिचे आई-वडील दुष्टशक्तीच्या मोहजालातून बाहेर पडतात की त्याला अजून बळी पडतात हे जाणूण घेताना वाचकांची उत्कंठा अजूनच वाढते.
Thanks for subscribing!
This email has been registered!