नेहमीप्रमाणे वेगळ्या आशयाची आणि वेगळ्या लेखन शैलीची श्याम मनोहरांची नवीन कादंबरी. पाच तरुण, उत्साही व्यावसायिकांची ही कथा. या पाच जणांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी त्यामुळे त्याची आयुष्य विस्कटून जाणं परंतु त्यातही त्यांना जगण्यातले वेगळे अमूल्य असे काही सापडणे अशी या कादंबरीची रचना आहे. या पाच कुटुंबाना जगण्याचे जे श्रेयस सापडते तेच खास ‘श्याम मनोहरी’ वैशिष्ट्य म्हणता येईल असे आहे. या पाच जणांनी सांगितलेल्या त्यांच्या आयुष्याच्या गोष्टीतूनच ही कादंबरी आकार घेते.