भूतकाळ आणि वर्तमान काळ यांची ऐतिहासिक सांगड घालणारी ही एका संस्थानाची कहाणी आहे, केवळ पूर्वजांनी घातलेल्या काही बंधनांमुळे दोन घराण्यांनी आपल्यातील संबंध पुढील सहा पिढ्या जोपासले, टिकविले आणि सातव्या पिढीपर्यंत उत्कर्षाला नेले. पण तसे करीत असताना त्यांना माहितीच नव्हते की या संस्थानाची जडण घडण म्हणजेच एक जबरदस्त कारस्थान होते. मग सातव्या पिढीतील वंशजांनी ते कसे शोधले, आपल्यातले पिढीजात नाते पुढे कसे ठेवायचे ठरविले याची उकल करणारी, उत्तर पेशवे काळाचा संदर्भ असणारी अशी ही एक रहस्यमय कहाणी अखेरचे कारस्थान या पुस्तकात लेखक अविनाश सोवनी यांनी गुंफली आहे.