मूळ भू-धारकांनी संघटित होऊन न्याय्य मार्गाने हे आंदोलन जवळजवळ साठ वर्षे चालवले, त्या भू-धारकांच्या नेत्यांची, त्यांना साथ देणार्या भूमिपुत्रांच्या लढ्याची ही कथा आहे.
ह्या सगळ्या दीर्घ लढ्याची संपूर्ण माहिती मिळविणे, कागदपत्रे तपासणे, मुलाखती घेणे, तपशील मिळवणे अशा विविध प्रकारचे क्षेत्रीय कार्य करून लेखिकेने हा लढा चित्रित केला आहे.
एका सत्य घटनेवर आधारित ही कादंबरी न्यायाच्या प्रतीक्षेत असणार्या अनेकांचे मनोबल वाढवणारी आहे.
एका दीर्घ संघर्षाची ही कहाणी ग्रामजीवनातील अलक्षित राहिलेल्या प्रश्नांची दखल घेते. हा संघर्ष स्थानिक असला तरी इतरत्रही शासन वा शासनमान्य संस्थांकडून संपादित केल्या जाणार्या शेतीची व त्यात होरपळणार्या भूमिपुत्रांची ही प्रातिनिधिक कादंबरी आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!