जगातील थोर योद्ध्यांमध्ये थोरल्या बाजीरावांचे नाव घेतले जाते. बाजीरावाने अनेक युद्धे जिंकली. असीम पराक्रम गाजवला. त्यामुळेच हे लढवय्या, शूर आणि स्वाभिमानी पेशवे कसे घडले, हे जाणून घेण्याची उत्सुकता मराठी माणसाला वाटते. ही उत्सुकता लेखक जयराज साळगावकर यांनी शमविली आहे.
त्यांची शिस्त, आक्रमकता, चपळता, निसर्गाचे भान या गुणांचा वेध या पुस्तकात घेण्यात आला आहे. बाजीरावाच्या आयुष्यात मस्तानीचा सहवास केवळ १७ महिन्यांचा होता. पण आजवर इतिहासात केवळ हे महिनेच अधोरेखित केले गेले. त्यामुळे बाजीरावाचे मूळ कार्य बाजूला पडले. साळगावकर यांनी या पुस्तकातून इतिहासकार आणि सामन्यांच्या या अपप्रवृत्तीवर बोट ठेवत बाजीरावाची महत्ता, दाखवून दिली आहे.
बाजीरावांच्या विजयी पराक्रमांचे रंगीत नकाशांसह विश्लेषण ह्या पुस्तकात आहे.