एका गावात होता एक मोठा डोंगर...त्याच्यावर होत्या फळबागा, पुÂलबागा, मुलांना खेळायला ऐसपैस बागा, कारंजी आणि बरंच काही...सगळ्या गावाचं डोंगरावर भारी प्रेम...तरीही नाराज का होता हा डोंगर...कशी दूर झाली त्याची नाराजी?...एका घनदाट जंगलात होता एक हत्ती...खूप मस्तवाल होता तो...लहान लहान प्राणी-पक्ष्यांना मुद्दामहून घाबरवायचा...एकदा तर त्याने चिमणीच्या घरट्याला आणि तिच्या पिलांना धोका पोचवायचा प्रयत्न केला...कसा गेला या हत्तीचा मस्तवालपणा?...एका जंगलातील एका अस्वलाला वाटलं आपण जंगलचा राजा का होऊ नये...आपल्या तर सगळ्या अंगावर आयाळ आहे आणि सिंहापेक्षा आपण जाडजूड आहोत...त्याने गुपचूप सिंहाचं निरीक्षण सुरू केलं...त्याचं डौलदार चालणं, झाडाखाली बसणं वगैरे...इतर प्राण्यांनीही आपल्याला राजा म्हणावं, असं अस्वलाने त्यांना सांगितलं...पण त्यांनी ऐकलं नाही...मग अस्वल राजा झालं की त्याची फजिती झाली?...प्राणी-पक्षी-निसर्ग यातून पुÂलत गेलेल्या गोष्टी...जोडीला रंगीबेरंगी आणि मनाला मोहवणारी चित्रं...