ज्यामुळे माणसाची रोगप्रतिबंधक शक्ती वाढते, तो आहार उत्तम मानला जातो. डॉ. अंजली मुखर्जी यांनी हाच विचार अधिक पुढे नेला आहे. आहारामध्ये व्याधी बऱ्या करण्याची, शरीराला नवचैतन्य देण्याची आणि आरोग्य टिकवून ठेवण्याची संपूर्ण क्षमता असते असा विचार त्यांनी मांडला आहे. ‘आहारातून उपचार’ हे पुस्तक लिहिण्यामागचा त्यांचा हेतूच मुळी हा आहे, की योग्य आहाराद्वारे आपण आपलं आरोग्य टिकवू शकतो, आपल्या जीवनाला सुविहित आकार देऊ शकतो, आणि परिणामस्वरूप आपलं आयुष्य वाढवू शकतो.