आता ती केवळ... राबणारी बिनचेह-याची बाई राहिलेली नाहीतर ती स्वत:चे हक्क असलेली स्वतंत्र नागरिक आहे. केवळ घरकाम, मोलमजुरीच नव्हेतर उद्योगसमूहाची अध्यक्षा... बँकेची व्यवस्थापिका... प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ती... ते उत्कृष्ट कलाकार अशा विविध कार्यक्षेत्रांत तिने आपल्या कर्तृत्वाचा ‘कॅन्व्हॉस’ चितारला आहे. अनु आगा... लीला पूनावाला... मेहेर पद्मजी... किरण मुझुमदार-शॉ... यांच्यासारख्या प्रथितयश उद्योजिका! शुभा मुद्गल, मल्लिका साराभाई यांच्यासारख्या कलाकार! शिखा शर्मा... नैना गिडवाई... प्रिया पॉल... यांच्यासारख्या यशस्वीता आणि सुवर्णकन्या पीटी उषा... यांच्या यशोगाथांचा हा आलेख!