कोणत्याही प्रकारची राजकीय पूर्वपिठीका नसताना सांगलीसारख्या सहकारसम्राटांच्या जिल्ह्यातून माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे नेतृत्व पुढे आले.
राजकारण्यांबद्दल फारसे चांगले न बोलणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनाही आर. आर. पाटील यांच्या रुपाने आशेचा किरण दिसत होता. त्यामुळेच अण्णा हजारे, मेधा पाटकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जीवनभर अंगिकारलेल्या तत्वांना केवळ आर.आर.पाटील यांच्यासाठी मुरड घालून त्यांचा निवडणुकीत प्रचार केला. सामान्य कुटुंबात जन्म घेऊनही कतृत्वाच्या भरारीला चांगुलपणाचे पंख लावून राजकारणात मोठी मजल मारता येते ही उमेद जागविणारे आर. आर. पाटील यांचे जीवन होते.
Thanks for subscribing!
This email has been registered!