गाववाड्यातील अन्याय, भ्रष्टाचार या विरुद्ध संघर्ष करून असहाय्य झालेल्या नायकाची-वकिलाची ही कथा. या खेडेगावात घडणारे प्रकार चिंताजनक तर आहेतच पण ते समाज व सरकारपुढे आव्हान उभे करणारे आहेत. समर्थपणे जगण्यासाठी जी जीवनमूल्ये आवश्यक आहेत, त्यांना समाज पारखा होत चालला आहे. या परिस्थितीचा शेवट काय होणार आहे? असा प्रश्न वाचकाच्या मनात ही कादंबरी वाचून निर्माण होतो. ग्रामपंचायतीचा गलथान कारभार व त्याप्रमाणे बनलेला समाज याचे भेदक पण वास्तववादी चित्रण श्री. गुंजाळ यांनी या कादंबरीत केले आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!