…महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व हे विशेषण पु. लं. साठीच निर्माण झाले आणि वापरून वापरून ते कितीही गुळगुळीत झाले असले तरी आता पुन्हा दुसऱ्या कुणा मराठी माणसासाठी वापरता येईल, अशी शक्यता दिसत नाही…
पु. लं. नी विरोधकांवरही प्रेम केले. ‘पुलकित’ मराठी माणूस त्यांच्या जाण्याने मनापासून दुःखी झाला. आठवणींना सर्जनाच्या पातळीवर नेणे हे सोपे काम नाही. आठवणी मुळातच स्थूल स्वरूपाच्या असतात…या आठवणींत महानोर आत्मनिवेदन करतात, स्वत:लाही प्रक्षेपित करतात. भावनाविवशही होतात, पण कल्पनेचा आश्रय जवळपास घेत नाहीत. |