पाचजणं आहेत. चाळिशीतले. तरुणाईचा उत्साह असणारे. पाचीजणं इतके एकरूप, त्यांच्या बोलण्यात आम्ही असं अनेकवचनी सर्वनाम येतु. पाचीजणं व्यावसायिक आहेत. खूप कष्ट करतात. व्यवसायात रमलेले. आनंदाने जगणारे. कुटुंबांना आनंदात ठेवणारे.
त्यांच्या जगण्यात, व्यवसायात अडचणी, संकटे येतात. काही काळ त्यांचे आनंदात जगणे विस्कटते. अडचणी, संकटे ह्यावर ते मार्ग काढतात आणि आनंदाचे जगणे पुन्हा प्रस्थापित करतात.
त्यांनी किंवा कुणीही कल्पनाही करू शकणार नाही, असे चमत्कारिक त्यांच्या जगण्यात येते. ते बिथरतातही… त्यांचे आनंदात जगणे कायमचे विस्कटते. तरी त्यांना वेगळे, अमूल्य असे जगण्यातले उमजते.
त्यांची त्यांनी आम्ही म्हणत सांगितलेली ही गोष्ट.
Thanks for subscribing!
This email has been registered!