जयप्रकाश भालचंद्र झेंडे हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. टाटा मोटर्स या जनप्रसिद्ध वाहन उद्योगात त्यांनी तीस वर्षे वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम केले. त्यात प्लॅनिंग, कास्टिंग आणि इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग या विभागांचा समावेश होता. या काळात भारतात नवीनच आलेल्या कायझेन, सजेशन स्किम, क्वालिटी सर्कल, फाइव्ह एस अशा आपल्या कामात निरंतर सुधारणा करणाऱ्या जपानी कार्यपद्धतीत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. |