२६/११. मुंबईवरचा दहशतवादी हल्ला. शेकडो मृत. हजारो जखमी. दहांपैकी फक्त एक अतिरेकी जिवंत.
अजमल आमिर कसाब. कसाब पाकिस्तानचा. हल्ला पाकिस्तानपुरस्कृत. कटाची पाळंमुळं देशविदेशांत रुजलेली. भारतविरोधी षड्यंत्राचे हे पुरावे शोधणं, उलगडणं आणि जोडणं - महाकाय काम! आपल्या तपास यंत्रणांनी ते पेललं. समर्थपणे. आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली या निःपक्षपाती खटल्याची वाखाणणी.
कालकूपीत जाऊन बसलेल्या, इतिहासाच्या काळ्याकुळकुळीत तपासाचा हा साद्यंत, सचित्र वृत्तांत. प्रथमपुरुषी, एकवचनी...
Thanks for subscribing!
This email has been registered!