कोरेगाव भीमाची लढाई ही १८१७ ते १८१८ दरम्यान तिसरे इंग्रज मराठा य़ुध्द झाले त्यातील एक घटना आहे नोव्हेंबर १८१७ मध्ये झालेल्या खडकी आणि येरवडा येथील लढाईनंतर आणि फेब्रुवारी १८१८ मधील आष्टी येथील लढाईपूर्वी १ जानेवारी १८१८ रोजी केरेगाव भीमा परिसरात इंग्रज आणि मराठा सैन्य आमने सामने आले आणि लढाई झाली इंग्रजांचे नेतृत्व कॅप्टन फ्रान्सिस स्टॉटनकडे होते बॉम्बे नेटिव्ह इन्फन्टरी मद्रास आर्टिंलरी हॉर्स या पलटणी इंग्रजी सैन्यात होत्या त्यांच्या सैन्यात विविध जाती धर्माचे सैनिक होते मराठा सैन्यातही विविध जाती धर्माचे सैनिक होते कोरेगाव भीमाची लढाई चालू असताना स्वत: सातारचे छत्रपती प्रतापसिंह भोसले हे दुसरे बाजीराव पेशवे यांसह फौजेसोबत होते तिसरे इंग्रज मराठा युध्द व कोरेगाव भीमाच्या या अनिर्णायक लढाईचे तत्कालीन अस्सल संदर्भ कागदपत्र उपलब्ध आहेत
Thanks for subscribing!
This email has been registered!