लहान मुलांना शहाणं करण्यासाठी गोष्टी सांगण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे.
सुदर्शन राजाच्या तीन उनाड राजपुत्रांना आयुष्यातील नीतिमूल्य शिकवण्याची जबाबदारी विष्णूशर्मा नावाच्या विद्वान पंडीताने स्वीकारली. यासाठी त्याने रचलेल्या कथा हितोपदेश ग्रंथात समाविष्ट केलेल्या आहेत. यातील बहुतांश कथा पंचतंत्र नावानेही ओळखल्या जातात.
मुलांचे मनोरंजन करता करता नकळत त्यांच्या मनावर चांगल्या-वाईटाचे संस्कार करणार्या, त्यांना नीतिमूल्यांची ओळख करून देणार्या या हिताच्या गोष्टी.
लहान मुलांना आवडतील अशा गोष्टींच्या या संग्रहात प्रसिद्ध चित्रकार पुण्डलीक वझे यांनी सुंदर चित्रं काढली आहेत.
Thanks for subscribing!
This email has been registered!