‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीत दर रविवारी नियमितपणे एक वर्षभर ‘सांगतो ऐका’ ह्या शीर्षकांतर्गत मनोहर पारनेरकरांनी हे लेख लिहिले. शीर्षकाच्या दोन शब्दांत लेखमालेचा उद्देश पूर्णत: सामावलेला होता : संवाद. ‘मी सांगतो आहे, तुम्ही ऐका.’ पारनेरकरांच्या ह्या सादेला वाचकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आणि त्यांचं सांगणं ऐकण्यात वाचक रंगून गेले. हे लेख वाचून आपण होतो त्याहून मनाने, ज्ञानाने अधिक समृद्ध झालो आहोत, असे वाचकांना नक्कीच वाटेल. तितका ह्या लेखांचा आवाका आहे. शांता गोखले
Thanks for subscribing!
This email has been registered!