माधुरी पुरंदरे यांच्या 'शेजार' या पुस्तक-संचातील दुसरे पुस्तक.
केतकीचे सगळेच शेजारी काही सख्खे नाहीयेत. म्हणजे ते चंद्रसदनात राहत नाहीत; पाचव्या गल्लीत कुठे कुठे असतात. पण तरीही ते शेजारीच असतात. त्यांच्यातल्या कुणाशी केतकीची छान गट्टी होते, तर कुणाशी नुसतीच ओळख. पाचवी गल्लीच एकूण छान आहे. आणि चंद्रसदन! ते तर परीकथेतल्या घरासारखं हसरं, खेळकर झालंय. आताशा मावशीआजीची कुरकुरही कमी ऐकू येते; कारण 'आपण छान केलं की सगळंच छान होतं; जुनंही आणि नवंही'...
Thanks for subscribing!
This email has been registered!