लहान मुलांसाठी कविता लिहिणं हे तसं आव्हानात्मक काम असतं. कारण कवितेसंबंधींचे सगळे नियम, व्यासंग आणि पांडित्य इथे दूर सारून निर्मळपणे व निरागसपणे कविता लिहाव्या लागतात. शांताबाईंचा हा बालकवितासंग्रह मुलांच्या निरागसतेला साद घालतो. त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देतो. त्या एका कवितेत म्हणतात,
वार्याचा या रंग कसा
आई मला सांग
पहाटेच्या उजेडात
येते त्याला जाग
पुनवेच्या चांदण्यात
किती गं सुंदर
चांदणेच शिंपडतो
माझ्या अंगावर
वझे यांची चित्रं कवितांना साजेशी असून त्यामुळे कवितेची गंमत अधिक खुलते.
Thanks for subscribing!
This email has been registered!