ज्यांना वाचता येत नाही त्यांना आपण अशिक्षित म्हणतो. पण वाचता येत असूनही वाचत नाहीत त्यांना काय म्हणायचं ? आणि वाचतात पण वाचलेलं कळत नाही असेही आहेतच की! या पुस्तकात या दोन समस्यांचा विचार केला आहे. पहिली आहे वाचनाच्या सवयीचा अभाव आणि दुसरी आहे, न समजता केलं जाणारं वाचन. या दोन्ही समस्यांचं मूळ खरंतर आपल्या शिक्षण पद्धतीतच आहे.
हे पुस्तक पालक, शिक्षक आणि वाचनाविषयी आस्था असलेल्या सगळ्यांसाठी आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!