चित्रकार किंवा व्यंगचित्रकार हा कागदाआडचा कलावंत असतो. त्यांचा रसिकांशी समक्ष, साक्षात संवाद घडणं तसं कठीणच असतं. फडणीस यांचे कार्यक्रम सुरू असताना अनेक जणांनी त्यांना तुम्ही तुमचे अनुभव लिहायला हवे असं सुचवलं. त्यातून फडणीसांना प्रेरणा मिळाली आणि रेषाटन हे पुस्तक साकारलं आहे.
या पुस्तकात फडणीस यांनी कॉपीराइटच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. तसंच चित्रकाराला ज्या व्यावहारिक गोष्टींना सामोरं जावं लागतं त्यावरदेखील प्रकाश टाकला आहे. त्यांचा चित्रकलेबद्दलचा दृष्टिकोनही त्यांनी यातून मांडला आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग्रंथपुरस्कार प्राप्त आत्मचरित्र!
Thanks for subscribing!
This email has been registered!