भाषेची परंपरा जितकी प्राचीन, तितका म्हणी अन् वाक्प्रचारांचा वापर अन् त्यांची संख्याही अधिक. मराठीतील म्हणी अन् वाक्प्रचारांचा उगम तर आढळतो थेट वैदिक, बौध्द, जैन अन् संतवाङ्मयात! इतर भाषा अन् अन्य संस्कृतींच्या संपर्कातूनही म्हणींचा, वाक्प्रचारांचा ठेवा वाढता राहतो. म्हणी अन् वाक्प्रचारांतून केवळ शब्दांचा अर्थ उलगडत नाही, त्यात उमटत असते भाषेचे, संस्कृतीचे, लोकजीवनाचे, परंपरेचे प्रतिबिंब. मराठी भाषेतील हा समृद्ध ठेवा वाचकांना सादर करणारा संग्रह
Thanks for subscribing!
This email has been registered!