मुल्ला नसरुद्दीन हे जागतिक पातळीवर गाजलेलं व्यक्तिमत्त्व. तुर्कस्तान, ग्रीस, उझबेकिस्तान, सिसिली असे अनेक देशांतले लोक तो मूळचा आमच्याच देशातला असा दावा करतात. तो नक्की कोणत्या देशातला हे सिद्ध करणं कठीण आहे. पण तो एका देशाचा असं म्हणण्यापेक्षा साऱ्या विश्वाचाच होता असं म्हणणं योग्य ठरेल, कारण अत्यंत बुद्धिमान, चतुर आणि हजरजबाबी असलेल्या नसरुद्दीनच्या कहाण्या साऱ्या जगतानेच उचलल्या आहेत.
Thanks for subscribing!
This email has been registered!