कोल्हापूरच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या जलरंग परंपरेतील ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत मांडरे यांच्या जलरंगातील निसर्गचित्रांचा हा संग्रह आहे. आपल्या गुरुंकडून मिळालेल्या ज्ञानाच्या बरोबरीने त्यांनी आत्मप्रेरणेने जलरंगचित्रणात भरीव कामगिरी केली आहे. त्यासाठी भारताबरोबरच युरोप, अमेरिकेतही भटकंती केली आहे. चित्रकार मांडरे यांची चित्रं, विषयांची विविधता, जलरंग हाताळणीमधील निर्दोष तंत्र व शिस्तबद्धता याचबरोबर रंगांचं निरीक्षण आणि चित्ररचना या गुणवैशिष्ट्यांसाठी अभ्यासनीय आहेत.
Thanks for subscribing!
This email has been registered!