‘आदिवासी’ या शब्दाभोवती अद्यापही एक कुतूहलाचे, जिज्ञासेचे वलय आहे. आदिवासींच्या जीवनाविषयीच्या संस्कृतीची आपल्याला उत्सुकता असते, परंतु त्याची नीटशी माहिती नसते.
खरंतर, निसर्गात मानवी जीवनाला सुरुवात झाली आणि निसर्गातच त्याचे जीवन बहरत गेले. काळाच्या ओघात आपण या मूळ निसर्गापासून कदाचित जरा दूर गेलो आहोत, पण या आदिवासी जमातींचे आणि निसर्गाचे नाते आजही अभिन्न आहे. खडतर जीवनाच्या गरजेतून कलेची निर्मिती करणार्या या आदिवासी जीवनाचे प्रतिबिंब कसे असेल याचा सुरेख आढावा या पुस्तकात घेतला आहे
Thanks for subscribing!
This email has been registered!