अडीच हजार वर्षांपूर्वी या भूतलावर एक महापुरुष जन्मला. प्रज्ञा अन् परिश्रम यांच्या संगमातून त्याने सम्यक ज्ञानाची प्राप्ती केली. अखिल विश्वासाठी तो वंदनीय झाला. सिद्धार्थ गौतमाचा ‘बुद्ध' बनला. मानवी आयुष्यातील दु:खाचा परिहार करण्यासाठी बुद्धाने चार आर्यसत्ये, अष्टांगमार्ग, प्रतीत्यसमुत्पाद यांच्या आधारे धम्मतत्त्वांचा प्रसार केला. ज्ञान, करुणा, दया, अहिंसा, शांती यांचा संदेश देणारा दीप प्रत्येकाने अंतर्मनात लावावा, ही शिकवण साऱ्या मानवजातीसाठी सांगितली. आज अडीच हजार वर्षांनंतरही बुद्धविचारांचा नंदादीप तेजाने तेवतोच आहे. राजपुत्र सिद्धार्थ ते तथागत बुद्ध या जीवनप्रवाहाचा मागोवा घेणारे - आजच्या अस्थिर, अनिश्चित परिस्थितीत; व्यक्तिगत अन् सामूहिक जीवनसंघर्षात अढळ ध्रुवासारखे मार्ग दाखवणारे चरित्र.
Thanks for subscribing!
This email has been registered!