संस्कृत साहित्यातील दहा प्रसिद्ध साहित्यकृती यात मराठी ललितकथांच्या स्वरूपात अवतरल्या आहेत. संस्कृत भाषेची जाण नसलेल्या मराठी वाचकाला या पुस्तकाच्या रूपाने कालिदास, भास, शूद्रक, अश्वघोष, श्रीहर्ष, बाणभट्ट अशा संस्कृत साहित्यकारांच्या रचनांचा आस्वाद घेता येईल. मूळ कथांचे हे केवळ अनुवाद किंवा भावानुवाद नाहीत. डॉ. संगीता बर्वे यांनी आपल्या प्रवाही आणि रसाळ शैलीत केलेली ही नवनिर्मिती आहे.
अभिज्ञानशाकुंतल, कादंबरी, मालतीमाधव, मृच्छकटिक, स्वप्नवासवदत्त, बुद्धचरित, सौंदरनंद, प्रतिज्ञा यौगंधरायण व मेघदूत ही नाटके यात गोष्टीरूपात वाचायला मिळतील.
Thanks for subscribing!
This email has been registered!