मुलांसाठी दोन दीर्घकथा - 'त्या एका दिवशी' आणि 'मला क्रियापद भेटते तेव्हा'.
त्या एका दिवशी
गौतमचं खरं म्हणजे आपल्या आईबाबांवर प्रेम होतं; पण हल्ली काहीतरी बिनसलं होतं.
त्याला त्यांचं काहीच पटेनासं झालं होतं. पूर्वी असं होत नसे. मग उन्हाळ्याच्या सुट्टीत त्या एका दिवशी
बाबाबरोबर केलेला प्रवास एक वेगळाच अनुभव देऊन गेला आणि आई-बाबांना जाणवलं,
की गौतम आता मोठा झाला आहे; मोठा, शहाणा आणि समजूतदार....
मला क्रियापद भेटले तेव्हा...
‘मला क्रियापद भेटले तेव्हा...’ हा काय निबंधाचा विषय आहे?
पण सरांनी तो दिला आणि चिन्मयीची चिडचिड झाली.
पण लिहिता लिहिता तिला एका क्रियापदाबरोबर झालेल्या कितीतरी भेटीगाठी आठवत गेल्या :
मजेदार, हळव्या, दुखऱ्या, मनाच्या आतल्या कप्प्यात जपून ठेवाव्यात अशा आठवणी.
Thanks for subscribing!
This email has been registered!