चंद्रपूरच्या ग्रामीण भागातल्या शाळेतील शिक्षिका कृतिका यांनी मुलांना लिहितं केलं, आत्मविश्वास दिला आणि मुलांनी आपले अनुभव स्वतःच्या बोलीभाषेत कथारूपात मांडले. मुलांनी जगलेले आयुष्य आपल्यासमोर बिनधास्तपाने ठेवणाऱ्या, मुलांचे अनुभव त्यांच्याच नजरेतून बघण्याची संधि देणाऱ्या या कथा म्हणजे मुलांच्या कथासाहित्यात मुलांनी स्वतःच घातलेली मोठी भर आहे. वासिमबारी मणेर यांनी या गोष्टी अत्यंत सृजनशील पातळीवर सर्व वाचकांपर्यंत पोचतील आणि तरीही मुलांच्या भाषेचं स्थान अबाधित राहील अशा पद्धतीने संपादित केल्या आहेत.
Thanks for subscribing!
This email has been registered!