आमचं घर रस्त्याला लागून होतं. अगडम् बगडम् खेळत बसलेली मिनी अचानक खिडकीकडे धावली आणि मोठमोठ्याने हाका मारू लागली, ‘‘काबुलीवालाऽ! एऽ काबुलीवालाऽ!’’
ढगळ मळके कपडे, डोक्यावर पगडी, काखेत झोळी आणि हातात द्राक्षांच्या दोन-चार पेट्या घेतलेला एक धिप्पाड पठाण मंद मंद पावलं टाकत रस्त्यावरून चालला होता.
मिनीच्या हाका ऐकून काबुलीवाला मागे वळून हसला आणि आमच्या घराच्या दिशेनं यायला निघाला.
काबुलीवाला, पुनरागमन, सुट्टी, पोस्टमास्तर, सुभा, मास्तरमहाशय, नवीन बाहुली अशा प्रसिद्ध नऊ कथानकांचा या पुस्तकात समावेश केला आहे. पद्मिनी बिनीवाले यांनी केलेल्या सरळ सोप्या रूपांतरामुळे मुलांना रवींद्रनाथांची ओळख होईल व त्यांच्या साहित्याची गोडी लागेल. यातूनच त्यांना अभिजात साहित्याविषयी ओढ निर्माण होईल. मुलांसोबत पालकांनाही या गोष्टी वाचता येतील.
Thanks for subscribing!
This email has been registered!