पुण्यातल्या चित्रकार मंडळींमध्ये गोंधळेकर यांचं नाव महत्त्वाचं आहे. लंडनच्या स्लेड स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकलेले, विद्वान, बहुश्रुत, जे.जे.स्कूल ऑफ आर्टचे माजी डीन, टाइम्स ऑफ इंडियाचे आर्ट डायरेक्टर अशी त्यांची प्रतिमा होती. अनेक चित्रकार मंडळींची त्यांच्याकडे ये-जा असे. त्यांच्या चित्रनिर्मितीवरही त्यांच्या समृद्ध व कलासक्त व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटलेला आहे.
या पुस्तकात सुहास बहुळकर, रमेशचंद्र पाटकर आणि राहुल देशपांडे या मान्यवरांचे अभ्यासपूर्ण लेख असून त्यातून गोंधळेकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!