कुसुमाग्रजांनी मोठ्यांबरोबरच लहानांसाठीदेखील कविता लिहिल्या आहेत. या बालकवितासंग्रहात बालगट ते कुमारगट अशा विविध वयोगटांसाठी कविता आहेत. चांदणगीतात ते म्हणतात,
हे सुंदर किति चांदणं
अहा हे सुंदर किति चांदणं
निळ्या जांभळ्या मखमालीवर
मोत्यांचं सांडणं
धरतीवरती चहूकडे
चांदफुलांची रास पडे
फुलांफुलांसम हसा सदा हे
चंद्राचं सांगणं
चाफा या कवितेत एक मुलगा आईला मी चाफा झालो तर मला ओळखशील का, असा प्रश्न विचारतो. नित्यनेमाची कामं आई करत असताना तो काय करेल व आई त्याला कसं ओळखेल हे या कवितेत कल्पकतेने मांडलं आहे. कविता तसंच चंद्रमोहन यांची चित्रं लहानांसोबतच मोठ्यांनाही आवडतील.
Thanks for subscribing!
This email has been registered!