बल्बचा शोध कुणी लावला, या प्रश्नाचं उत्तर म्हणून एकच नाव आठवतं. ते म्हणजे एडिसन. अर्थात, थॉमस अल्वा एडिसन. पण आजच्या युगात आपल्या अवतीभवती दिसणार्या जवळजवळ प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणाची सुरुवात एडिसनने केलेल्या संशोधनात झाली होती, असं म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही. संशोधन हा त्याचा प्राण होता. श्रेष्ठ अमेरिकन संशोधक म्हणून गौरवल्या गेलेल्या एडिसनचा हा प्रवास सहज तर नव्हताच, पण सरळही नव्हता. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असं म्हणतात. एडिसनने अनेक वेळा अपयशाचा सामना केला, तरीही तो कधीच थांबला नाही, निराश झाला नाही. आपल्या प्रत्येक कल्पनेचा, प्रत्येक कुतूहलाचा पाठपुरावा करणारा हा संशोधक-शास्त्रज्ञ कसा घडत गेला, त्याची ही कथा.
* विजेच्या दिव्यासाठी केलेले अनोखे प्रयोग * 1093 पेटंटस्चा मालक * प्रत्येक अपयशात शोधली संधी * कल्पनेचं खरं मूल्य जाणणारा संशोधक * कुतूहलाचा पाठपुरावा करणारं संशोधन * लोकांना आवडेल तेच मी विकेन, ही प्रतिज्ञा शेवटपर्यंत निभावणारा अवलिया
Thanks for subscribing!
This email has been registered!