चित्रकार शिवाजी तुपे गेली पन्नासहून अधिक वर्षं निसर्गचित्रणाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी निसर्गचित्रणाच्या निमित्ताने भारतात अनेक ठिकाणी भ्रमंती केली आहे. विविध रंगमाध्यमांप्रमाणेच त्यांनी पेन ॲन्ड इंक या माध्यमात वैशिष्ट्यपूर्ण काम केलं आहे. या पुस्तकात आउटडोअर स्केचिंगबद्दलचे त्यांचे विचार, काम करण्याच्या विविध पद्धती व माध्यमाची वैशिष्ट्यं त्यांनी सांगितली आहेत. यातली त्यांची चित्रं पाहताना या माध्यमातल्या चित्रनिर्मितीच्या शक्यता लक्षात येतात.
Thanks for subscribing!
This email has been registered!