देवीचे दागिने खोटे असल्याची गोष्ट धक्कादायक होती. पण रमा लगेचच यामागचं रहस्य कसं उलगडते... बोटी अचानक कशा गायब झाल्या याचं रहस्य चेडो आपल्या बुद्धिकौशल्याने कसं ओळखतो...चिंटू ट्रेनमध्ये चोराला कसं पकडतो...हे जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचायला हवं.
मोठ्या माणसांप्रमाणेच मुलंदेखील उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करतात, त्यामुळे गुप्तहेरही होऊ शकतात. रमा, चेडो आणि चिंटू या लहान गुप्तहेरांच्या या पुस्तकातल्या गोष्टी मुलांना नक्कीच आवडतील.
Thanks for subscribing!
This email has been registered!