विख्यात सर्पतज्ज्ञ निलीमकुमार खैरे गेली चार दशकांहून अधिक काळ सर्प, प्राणिसृष्टी आणि पर्यावरण या क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यांच्या आजवरच्या या क्षेत्रातील कामाचा बहुमान करण्यासाठी पश्चिम घाटात सापडलेल्या एका नव्या प्रजातीला 'खैरेंचा खापरखवल्या' (Melanophidium khairei) हे नाव देण्यात आले आहे.
या पुस्तकात त्यांनी आपल्याकडे आढळणार्या 65 सापांची माहिती रंगीत फोटोंसह दिली आहे. याबरोबर, सर्प व सर्पदंश कसे टाळावेत, विषारी संर्पदंशाची लक्षणं, प्रथमोपचार अशी बरीच माहिती यात मिळते.
उत्कृष्ट फोटो व सोप्या भाषेतील अत्यंत उपयुक्त माहिती यामुळे हे पुस्तक शेतकरी, बागाईतदार, रानावनात फिरणारे ट्रेकर्स यांच्यापासून ते डॉक्टर, या विषयाचे अभ्यासक या सगळ्यांना उपयोगी आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!