भारताला आजमितीला भेदणाऱ्या प्रमुख आर्थिक समस्या कोणत्या आहेत? त्यामागची आर्थिक, सामाजिक व राजकीय करणे कोणती? राजकीय चौकटीत निर्णय कसे घेतले जातात? राजकीय व्यूहरचनांचा आर्थिक धोरणांवर नक्की कसा प्रभाव पडत असतो? भारताला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी भारताची राजकीय चौकट व आर्थिक धोरणे अनुकूल आहेत का? अशा अनेक प्रश्नांना भिडणारे अर्थशास्त्रीय लघुनिबंध ‘वित्तार्थ’ ह्या पुस्तकात वाचावयास मिळतात