आज शिक्षकाची भूमिका अध्यापकाऐवजी सुलभक अशी मानली जाते. ही नवी भूमिका पार पाडत असताना शिक्षकाला गरजेच्या वाटणाऱ्या बाबी म्हणजे मूल कसे शिकते, मुलाच्या भाषा शिक्षणात मुलाच्या भावनिक जगाची भूमिका काय असते, मूल स्वतःहून शिकू शकेल अशा वातावरणाची निर्मिती कशी करावयाची, अशा अनेक बाबींचा या पुस्तकात ऊहापोह केला आहे.
याशिवाय भाषा शिक्षकाला माहीत असावीत अशी देवनागरी लिपीची व मराठी भाषेची वैशिष्ट्ये व व्याकरण यांच्याबद्दल या पुस्तकात शासन निर्णयाशी सुसंगत अशी माहिती दिलेली आहे.
आज फलटण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १५० शाळांमधील ३००हून अधिक शिक्षक या पुस्तकाचा लाभ घेऊन आपल्या शाळांमध्ये ज्ञानरचनावादाचा भक्कम पाया रचत आहेत.
Thanks for subscribing!
This email has been registered!